पेंट्स दुकानात चौकशीस गेलेल्या व्यक्तीस मारहाण; तिघांवर अदखलपात्र नोंद

by Team Satara Today | published on : 15 June 2026


सातारा : शहरातील एका पेंट्स दुकानात माहिती विचारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस दुकानाबाहेर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

राजेंद्र शंकरराव साळुंखे (रा. नवीन एमआयडीसी, सातारा) हे उदय पेंट्स दुकानात चौकशीसाठी गेले असता दुकानदार रेहान व त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पुढील प्रतिबंधक कारवाई ग्रेड पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा
पुढील बातमी
ठिबक पाईपच्या कारणावरून वाद विकोपाला; तुकाईवाडी शिवारात शेतकर्‍यावर विळ्याने वार

संबंधित बातम्या