सातारा : सातारा शहर परिसरातील एका 17 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून एका युवकाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी घरी एकटी असताना शेजारी राहणार्या आरोपीने तिला कामाचे कारण सांगून स्वतःच्या घरी बोलावले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पीडितेच्या तक्रारीवरून अर्जुन भगवान पवार (वय 21, रा. समर्थ मंदिर परिसर, सातारा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलीस उपनिरीक्षक भालेकर तपास करीत आहेत.