कोरेगाव-सातारा मार्गावर अवैध पिस्टलसह युवक ताब्यात; एलसीबीची धडक कारवाई; पिस्टलसह जिवंत काडतूस, दुचाकी जप्त

by Team Satara Today | published on : 15 June 2026


सातारा : जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने महत्त्वपूर्ण कारवाई करत एका युवकाला देशी बनावटीच्या पिस्टलसह ताब्यात घेतले. या कारवाईत एक जिवंत काडतूस व दुचाकीसह एकूण 1 लाख 50 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी अवैध शस्त्रे बाळगणार्‍यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

गोपनीय माहितीच्या आधारे ओंकार दत्तात्रय कदम (वय 23, रा. रामलिंग रोड, कोरेगाव) हा अवैध पिस्टल घेऊन विक्रीसाठी येणार असल्याचे पोलिसांना समजले होते. त्यानुसार कोरेगाव-सातारा मार्गावरील महागाव हद्दीतील राजधानी हॉटेल परिसरात सापळा रचण्यात आला.

संशयित युवक काळ्या रंगाच्या वेस्पा दुचाकीवरून घटनास्थळी येताच पोलिसांनी त्याला अडवून झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतूस तसेच दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचार्‍यांचे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी कौतुक केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
... हा तर प्रशासन - शिक्षक यांच्यातील विश्वासाचा मजबूत पूल
पुढील बातमी
विधान परिषद रणधुमाळी : भाजपची व्हीप रणनीती, समर्थक मतदारांना निवडणुकीपर्यंत ठेवणार एकत्र

संबंधित बातम्या