सातारा : सैनिक स्कूल कॅम्पसमधील बिल्डिंगमधून अज्ञात चोरट्याने सुमारे एक लाखाच्या साहित्याची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आनंद अनंतराव कमलापूरकर (रा. सैनिक स्कूल कॅम्पस, सदर बझार, सातारा) यांच्या नवीन बांधकामाच्या तराली इमारतीमधील तीन फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाख रुपये किंमतीच्या साहित्याची चोरी केली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.