वाठार पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ झालेले 25 मोबाईल हस्तगत; वाठार पोलिसांची कामगिरी

by Team Satara Today | published on : 13 June 2026


सातारा : वाठार पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ झालेले 25 मोबाईल हस्तगत करण्यात वाठार पोलिसांना यश आले असून हे मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात येत आहेत.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली, वाठार पोलीस ठाण्याचे सुशिल भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक  यांनी नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल शोध घेणेकामी वाठार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण (डी. बी.) पथकास सुचना दिलेल्या होत्या.

त्या अनुषंगाने डी.बी. पथकातील पोलीस स्टाफ व सायबर पोलीस ठाणे सातारा यांनी तांत्रिक बाबीचे आधारे महाराष्ट्रातुन व इतर राज्यातुन हस्ते परहस्ते मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क करुन चिकाटीने सदरची मोहिम राबविल्याने वाठार पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले 6 लाख 15 हजार रुपये किंमतीचे एकूण 25 मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत. तसेच हस्तगत करण्यात आलेले मोबाईल फोन संबंधित नागरिकांना परत देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. ही मोहिम अशाच प्रकारे सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे वाठार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सांगितले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सुशिल भोसले, गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाचे पोउनि. गहिणीनाथ सातव, पोउनि. नितीन भोसले, पो.हवा. तानाजी चव्हाण, उदय जाधव, जितेंद्र शिंदे, प्रकाश चव्हाण, पो कॉ. विठ्ठल काळे, प्रथमेश अलगुडे, प्रशांत गोरे, प्रतिक देशमुख, आशा देशमुख व सातारा सायबर पोलीस यांनी केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
करंजे औद्योगिक वसाहतीतील 29 भूखंडांवर पालिकेचा ताबा; ऑनलाइन लिलावाची तयारी; महसूलवाढीची संधी, पारदर्शक प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष
पुढील बातमी
साताऱ्यात राजवाडा परिसरात भररस्त्यात कोयत्यासह गोंधळ; तीन युवक पोलिसांच्या ताब्यात

संबंधित बातम्या