१८ जूनपर्यंत मोठ्या पावसाचा अंदाज नाही; मान्सून सध्या सोलापूर-बारामती भागात अडखळला

मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील वाऱ्यांचा वेग वाढला मात्र पाऊस नाही

by Team Satara Today | published on : 13 June 2026


पुणे : राज्यातील हवामान शुष्क अन कोरडे झाल्याने मध्यमहाराष्ट्र अन मराठवाड्यातला दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मान्सून सध्या सोलापूर-बारामती भागात अडखळला असून १८ जूनपर्यंत मोठ्या पावसाचा अंदाज नाही. शनिवारी विदर्भातील अकोला येथे ४३.५ अंश इतके तापमान नोंदले गेले.

उत्तर भारतातून आलेल्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील मान्सून अडखळला आहे. हवेचे दाब,वाऱ्यांची दिशा सध्या अनुकूल नाही. तसेच उष्ण वाऱ्यांनी हवेतील बाष्प शोषून घेतल्याने हा परिणाम झाला असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचे अलर्ट पूर्ण क्षीण झाले आहेत. मान्सूनची रेषा बारामती, हरणे, सोलापूर, हैदराबाद, भद्राद्री कोठागुडम, कलिंगपट्टणम, पारादीप, बारीपदा, पुरुलिया, धनबाद, मुझफ्फरपूर या ठिकाणांवरून जात आहे.

राजस्थान, गुजरातसह महाराष्ट्रातील विदर्भ ,मराठवाडा आणि मध्यमहाराष्ट्रातील कमाल तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी देशात जैसलमेर (राजस्थान) येथे सर्वाधिक कमाल तापमान ४४.२°C नोंदवले गेले. पुढील दोन दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश,पश्चिम बंगाल,ओडिशा, छत्तीसगडच्या काही भागांमध्ये नैऋत्य मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे.

आसाम आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार (१२-२० सेमी) पावसाची नोंद झाली आहे. हिमाचल प्रदेश, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि यानम, रायलसीमा, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू आणि मणिपूरमधील काही ठिकाणी मुसळधार (७-११ सेमी) पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील वाऱ्यांचा वेग वाढला मात्र पाऊस नाही

शनिवारचे कमाल तापमान - सातारा ३६.२ 

अकोला ४३.५,अमरावती ४२.४, बुलढाणा ४०.६, ब्रह्मपुरी ४१.९, चंद्रपूर ४०.८, गोंदिया ४०.६, नागपूर ४१,वर्धा ४३.५, यवतमाळ ४३.२.मुंबई ३६ रत्नानगिरी ३३.५, पुणे ३५.९, लोहगाव ३६.२, अहिल्यानगर ४०, जळगाव ४१.८, कोल्हापूर ३४, महाबळेश्वर २५.१, मालेगाव ४२.८, नाशिक ३५.७, सांगली ३५.५, सातारा ३६.२, सोलापूर ३९.३, धाराशिव ३७.१, छत्रपती संभाजीनगर ३९.३, परभणी ४०,बीड ३९.५


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटणच्या सह दुय्यम निबंधकांवर शासनाची मोठी कारवाई; १,५४५ दस्तांच्या संशयास्पद नोंदणीप्रकरणी दिपक पवार निलंबित
पुढील बातमी
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली उदयनराजे यांची भेट; महायुतीतील समन्वय, प्रतिनिधित्व आणि आगामी राजकीय समीकरणांवर चर्चा

संबंधित बातम्या