सातारा - स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे रत्नागिरी येथील कार्य सर्व भारतवासीयांनी विसरता कामा नये, खऱ्या अर्थाने अस्पृश्यता निवारण्याचे कार्य सावरकरांनी केले, असे उदगार सावरकर व्याख्याते आनंद कुलकर्णी यांनी काढले ते अखिल भारत हिंदुमहासभा व स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती आणि सावरकर भक्तांच्या मेळाव्यात बोलत होते.
आनंद कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील आरोपांचे उदाहरणे देऊन खंडण केले. यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सातारा नगपरिषदेचे भूतपूर्व अध्यक्ष डॉ. अच्युतराव गोडबोले हे होते. श्री गोडबोले यांनी आपल्या भाषणात सांगितले की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देश स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याची राख रांगोळी केली, ह्या समर्पनाची जाणीव भारतीय जनतेने ठेवले पाहिजे. सुप्रसिद्ध लेखक जगन्नाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सावरकर हे क्रांतिकारी, लेखक, महाकवी, नाटक कार, समाजसुधारक होते, मराठी भाषेला त्यांनी अनेक शब्द दिले, मराठी भाषा समृद्ध केली.
रणरागिणी सौ. भक्ती डाफळे यांनी सावरकरांचे हिंदुत्वचे, अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची आपण आज शपथ घेऊ असे सांगितले. अखिल भारत हिंदुमहासभा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्ता सणस यांनी ठराव मांडला की, शासनाने आमदार, खासदार, न्यायाधीश, नगराध्यक्ष यांचे सेवानिवृत्तचे वय ६५ वर्ष करावे, सक्तीने सेवानिवृत्त करावे. हा ठराव संमत करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचचे अध्यक्ष दुष्यंतराव जगदाळे हे हि उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उद्योग क्षेत्रासाठी मेढा-कुसुम्बी येथील संगीता मेंधे, समाजकार्य करणारे आनंदाश्रमचे डॉ अरविंद काळे, विधी क्षेत्रासाठी अधिवक्ता पुरषोत्तम बारसावडे, हिंदुजनजागृतीच्या रणरागिणी सौ. रूपाताई महाडिक व सौ. भक्तीताई डाफळे, हिंदुत्ववादी नेते व पंचापाळी हौद दुर्गामाता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख, मंदिर महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रशांत तुपे, गोरक्षक शैलेंद्र सावंत, कॅप्टन ज्ञानदेव मोरे, वैद्यकीय सेवेसाठी डॉ निखिल बोरा व साताऱ्याची ऑलिम्पिक सुवर्ण कन्या प्रांजली धुमाळ यांचे वडील गुरुवर्य प्रशांत धुमाळ यांचाही शाल, श्रीफळ, पुष्प व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन हिंदुमहासभा जिल्हाध्यक्ष धनराज जगताप यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश गांधी, विलास पाटील, सुनील घोलप, सोनाली शेलार, प्रिती गांधी, सोमनाथगिरी महाराज, ललित ओसवाल, कैवल्य माने, गणेश भिसे, महादेव कुलकर्णी, सचिन पंडित यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता सपूर्ण वंदेमातरम ने करण्यात आली.