भरधाव दुचाकी घसरल्याने जखमी झालेल्या पुणे येथील चालकाचा मृत्यू; वासोळे गावाजवळ झालेल्या अपघात

by Team Satara Today | published on : 12 June 2026


सातारा : सातारा तालुक्यातील वासोळे गावाजवळ झालेल्या अपघातात प्रीतम मल्हारी बनसोडे (वय 36, रा. निगडी, पुणे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 25 मे रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास सातारा-वाठार मार्गावर वासोळे कमानीजवळ त्यांची दुचाकी भरधाव वेगात असताना नियंत्रण सुटले. रस्त्याच्या कडेला साचलेल्या मुरुमाच्या ढिगार्‍यावर दुचाकी घसरून अपघात झाला. या घटनेत अक्षय सुरेश देखने यांना किरकोळ दुखापत झाली, तर प्रीतम बनसोडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. अक्षय देखने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघातात गंभीर जखमी झालेल्या उपचारादरम्यान अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
पुढील बातमी
माहुलीत युवकाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या