अपघातात गंभीर जखमी झालेल्या उपचारादरम्यान अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 12 June 2026


सातारा : मार्च महिन्यात कणसे किया शोरूम परिसरात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका अनोळखी व्यक्तीचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित व्यक्तीचे वय अंदाजे 55 वर्षे असून 16 मार्च रोजी अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने 2 जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. अद्याप त्यांची ओळख पटलेली नसून महिला पोलीस उपनिरीक्षक भालेकर पुढील तपास करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहर व परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुली बेपत्ता
पुढील बातमी
भरधाव दुचाकी घसरल्याने जखमी झालेल्या पुणे येथील चालकाचा मृत्यू; वासोळे गावाजवळ झालेल्या अपघात

संबंधित बातम्या