सातारा : वर्ये येथील विठ्ठल मंगलम कार्यालयासमोरील बांधकामस्थळावरून सुमारे 30 हजार रुपये किमतीच्या 15 लोखंडी सेंट्रींग प्लेटा चोरीला गेल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, व्यवस्थापक मनोज सपकाळ यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अज्ञात चोरट्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार कुमठेकर तपास करत आहेत.