सातारा : अवैध सावकारीच्या कथित प्रकरणात आकाश उर्फ तात्या साबळे, नाना चौगुले, प्रतीक पोद्दार आणि अक्षय साबळे यांच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
फिर्यादी प्रवीण इंगवले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तीन लाख रुपयांच्या कर्जावर मोठ्या प्रमाणात व्याज वसूल करूनही आरोपींनी आणखी पाच लाख रुपयांची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्याने फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला पाच दिवस एका बंदिस्त जागेत डांबून ठेवून धमकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी खंडणी, बेकायदेशीर कैद, धमकी तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करत आहेत.