सातारा : वाढे फाटा परिसरात पोलिसांनी संशयित दुचाकीवर कारवाई करत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुचाकीच्या मालकीबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती अथवा कागदपत्रे सादर करता न आल्याने ही कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना एमएच 46 सीसी 9484 क्रमांकाची यामाहा आर-15 मोटारसायकल संशयास्पद स्थितीत आढळली. सुमारे 60 हजार रुपये किमतीच्या या दुचाकीबाबत चौकशी केली असता संबंधितांकडे मालकी हक्काचे पुरावे नव्हते. त्यामुळे वाहन चोरीचे अथवा बेकायदेशीररीत्या मिळविल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अशिककेश डोळस यांच्या फिर्यादीवरून प्रदीप लक्ष्मण पवार (रा. सदर बाजार, सातारा) आणि भीमराव विजय वाघमारे (रा. कारळे धनगर वस्ती, ता. पाटण) यांच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल शिंदे करीत आहेत.