यशवंतराव मोहिते कृष्‍णा साखर कारखाना निवडणुकीत दुरंगी सामना; ५३ उमेदवारांचे अर्ज मागे, लढतीचे चित्र स्पष्ट

by Team Satara Today | published on : 10 June 2026


कराड :  यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत मंगळवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ५३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून सत्ताधारी सहकार पॅनेल विरूध्द कृषी महर्षि आबासाहेब मोहिते पॅनेल अशी दुरंगी लढत पहायला मिळणार आहे. ४४ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले असून यामध्ये २ अपक्ष आहेत. उद्या सकाळी चिन्ह वाटप होईल, त्यानंतर पॅनेलच्या उमेदवारांची यादी अधिकृत जाहीर केली जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी दिली.

अर्ज भरण्याच्या अंतीम दिवशी १३९ उमेदवारी अर्ज होते. त्यापैकी छाननीनंतर १२२ अर्ज उरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतीम दिवशी उरलेल्या ९६ पैकी ५३ जणांनी मागार घेतली. त्यामुळे रिंगणात ४४ उमेदवार राहिले आहेत. दोन्ही पॅनेलनी त्यांच्या उमेदवारांची यादी ही जाहीर केली आहे. त्यामुळे दोन्ही गटात थेट लढत आहे. उद्या चिन्ह वाटपानंतर त्याचेही चित्र स्पष्ट होईल.

सहकार पॅनेलचे अधिकृत उमेदवार 

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. १ (वडगाव हवेली - दुशेरे) - धोंडीराम शंकरराव जाधव (दुशेरे, ता. कराड), जगदीश दिनकरराव जगताप (वडगाव हवेली, ता. कराड), आनंदा सोपान खबाले (विंग, ता. कराड). सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. २ (कार्वे - काले) - अरविंद गुणवंतराव पाटील (आटके, ता. कराड), दयाराम भिमराव पाटील (काले, ता. कराड), बाजीराव नारायण थोरात (कार्वे, ता. कराड). सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ३ (तांबवे - नेर्ले) - दत्तात्रय हणमंत देसाई (वाठार, ता. कराड), लिंबाजी महिपतराव पाटील (तांबवे, ता. वाळवा), संभाजीराव आनंदराव पाटील (नेर्ले, ता. वाळवा). सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ४ (बोरगाव - रेठरे हरणाक्ष) - जयवंत दत्तात्रय मोरे (रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा), सत्यजीत जितेंद्र पाटील (बोरगाव, ता. वाळवा), सुनिल भिमराव पाटील (कामेरी, ता. वाळवा). सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ५ (येडेमच्छिंद्र - वांगी) - संग्राम विश्वासराव पाटील (येडेमच्छिंद्र, ता. वाळवा), बाबासो खाशाबा शिंदे (देवराष्ट्रे, ता. कडेगाव). सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ६ (रेठरे बुद्रुक - शेणोली) - सुरेश जयवंतराव भोसले (रेठरे बुद्रुक, ता. कराड) बाजीराव दाजी निकम (शेरे, ता. कराड). महिला राखीव गट - सुजाता दीपक जाधव (कापील, ता. कराड), सुनिता संजय शेवाळे (सवादे, ता. कराड). अनुसूचित जाती-जमाती राखीव गट - छबन जगन्नाथ कांबळे (कोळे, ता. कराड). भटक्या विमुक्त जाती-जमाती / विशेष राखीव गट - अविनाश मधुकर खरात (खरातवाडी, ता. वाळवा). इतर मागास प्रवर्ग राखीव गट - बाळासो आकाराम जगताप (कोडोली, ता. कराड).

कृषी महर्षी आबासाहेब मोहिते पॅनेल

गट नं 1 - आनंदा तुकाराम जगताप, प्रताप धोंडीराम जगताप, दुर्योधन पांडुरंग खबाले. गट नं 2 -संतोष नागनाथ थोरात, प्रतापराव वसंतराव पाटील, शांताराम शंकर पाटील, गट नं 3 - सुरेश /सुभाष बाबुराव पाटील, सुभाष उध्दव पाटील, किरण दिलीप पाटील, गट नं 4 - जयकर शिवाजी शिंदे, महेश राजाराम पवार, महेश अशोकराव पाटील, उदयसिंह प्रतापराव शिंदे. गट नं 5 - माणिकराव आनंदराव मोरे, सुरेश गणपती पाटील. गट नं 6 - अविनाश जगन्नाथ मोहिते, दीपक रामचंद्र (धोंडी) कणसे. महिला राखीव - अर्चना अविनाश मोहिते, विजया उत्तमराव पाटील. अनुसूचित जाती जमाती राखीव -सुधीर गोविंद रोकडे. इतर मागास प्रवर्ग- प्रकाश बाळकृष्ण श्रीखंडे. भटक्या विमुक्त जाती व जमाती / विशेष राखीव गट - दिलीप तुकाराम गलांडे. 2 अपक्ष उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्याजवळील अपघातात अभिनेत्री पूजा सावंत जखमी
पुढील बातमी
पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देश प्रगतीपथावर - ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले; काळाराम मंदिर येथे महाआरती उत्साहात

संबंधित बातम्या