सातारा : सार्वजनिक ठिकाणी चिलीमद्वारे अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे आढळून आल्याने एका युवकाविरोधात सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाशेजारील कॅनॉल परिसरात पोलिसांनी छापा टाकला असता संबंधित युवक चिलीम ओढताना आढळून आला. पोलिस शिपाई सचिन आदमाने यांच्या फिर्यादीवरून शुभम अजय पवार (रा. लक्ष्मी टेकडी, सदरबझार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक महिला पोलीस उपनिरीक्षक अनधुळे करीत आहेत.