शाळकरी मुलीवर अत्‍याचार करणार्‍या तरुणास अटक; महाबळेश्वर पोलिस ठाण्यात बाल पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 08 June 2026


महाबळेश्‍वर : महाबळेश्‍वर तालुक्यातील एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सौरभ दिनेश मोरे (वय २६, रा. महाबळेश्वर) याच्याविरुद्ध महाबळेश्वर पोलिस ठाण्यात बाल पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.

पीडित मुलीला वारंवार पोटदुखीचा त्रास होत असल्याने तिच्या आई-वडिलांनी तिला वाई येथील एका खासगी रुग्णालयात नेले होते. तेथे तपासणीदरम्यान ती ६ आठवड्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. पीडिता अल्पवयीन असल्याने संबंधित डॉक्टरांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पीडित मुलगी महाबळेश्‍वर तालुक्यातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. शाळेत ये-जा करताना तिची संशयित युवकाशी ओळख झाली होती. २ मे रोजी सकाळी शाळेतून घरी जात असताना संशयिताने तिला वाहनातून घरी सोडण्याचा बहाणा करून सोबत घेतले. मात्र, तिला घरी न नेता तापोळा परिसरातील दुर्गम भागात नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

यानंतर मुलीने पोटदुखीची तक्रार केल्याने तिच्या पालकांनी वैद्यकीय तपासणी केली असता, संपूर्ण प्रकार समोर आला. त्यानंतर पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी संशयित सौरभ दिनेश मोरे याच्याविरुद्ध पोक्‍सोअंतर्गत गुन्‍हा दाखल करून त्‍याला अटक केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाई तालुक्याच्या पूर्व भागाला पावसाचा फटका; पाचवड ते वेळे दरम्यानच्या महामार्ग परिसरात मोठे नुकसान
पुढील बातमी
मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मेघराज भोसलेंच्या नेतृत्वाखालील 'समर्थ पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी

संबंधित बातम्या