महामार्गालगतच्या हॉटेलवर धाड; हॉटेल मालकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 08 June 2026


सातारा  : वाढेगाव हद्दीतील सातारा-पुणे महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलवर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकून मद्यसेवनासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले.

कारवाईदरम्यान विदेशी मद्य, प्लास्टिक खुर्च्या, टेबल आणि काचेचे ग्लास असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी हॉटेल मालकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुचाकीतून देशी दारूच्या वाहतूकप्रकरणी जकातवाडी परिसरात पोलिसांची कारवाई
पुढील बातमी
संशयास्पद हालचाली करणाऱ्या युवकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या