सातारा : जकातवाडी रोडवरील बोगदा परिसरात सातारा तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत दुचाकीतून देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला पकडले.
या कारवाईत ९० हजार रुपये किमतीची होंडा अॅक्टिव्हा आणि १०० देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. एकूण ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.