सातारा : लग्नावेळी फ्रीज आणि कुलर न दिल्याचा मुद्दा उपस्थित करत विवाहितेला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, विवाहानंतर घरखर्च, भाडे आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या तिच्यावर टाकण्यात आल्या. तसेच वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी आणि पैशांची मागणी करण्यात येत होती. या तक्रारीनंतर पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.