काशीळच्या अस्मिता जाधवला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी थेट संवाद व सहभोजनाची संधी; साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

सीमेवरील त्रिपुरातील लंकामुरा बॉर्डर चौकी येथे केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी साधला बीएसएफ जवानांशी संवाद

by Team Satara Today | published on : 07 June 2026


सातारा : देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून सीमा सुरक्षा दलात दाखल झालेल्या सातारा जिल्ह्यातील काशीळ येथील अस्मिता दीपक जाधव हिच्या वाट्याला नुकताच एक अविस्मरणीय आणि अभिमानास्पद क्षण आला. 

भारत-बांगलादेश सीमेवरील त्रिपुरातील लंकामुरा बॉर्डर चौकी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बीएसएफ जवानांशी संवाद साधला, तसेच मार्गदर्शनही केले. या विशेष कार्यक्रमासाठी निवड झालेल्या जवानांमध्ये अस्मिता जाधव हिचा समावेश होता. सीमेवर कार्यरत जवानांच्या समस्या, अनुभव आणि मनोगत जाणून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या संवाद कार्यक्रमात अस्मिताला थेट केंद्रीय गृहमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

संवादादरम्यान अमित शहा यांनी अस्मिताला, ‘तुम कहाँ की हो?’ असा प्रश्न विचारला. त्यावर अस्मिताने अभिमानाने ‘महाराष्ट्र, सातारा’ असे उत्तर दिले. साताऱ्याचा उल्लेख होताच शहा यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. त्यांनी तत्काळ, ‘कोल्हापूर मेरा ससुराल है और मेरा जन्म मुंबई में हुआ है,’ असे सांगत महाराष्ट्राशी असलेल्या आपल्या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण सांगितली. त्यामुळे औपचारिक कार्यक्रमात क्षणभर आपुलकीचे आणि कौटुंबिक वातावरण निर्माण झाले.

यानंतर महाराष्ट्रातील कृषी आणि खाद्य संस्कृतीबाबतही चर्चा रंगली. साताऱ्यात कोणती कडधान्य घेतली जातात, याबाबत विचारणा करत शहा यांनी ज्वारी, बाजरी आणि गव्हाचा उल्लेख केला. ‘सातारा में ज्वार होता है क्या?’ असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर अस्मिताने ‘हाँ, हम ज्वार की रोटी खाते है,’ असे उत्तर दिले. या संवादातून महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीबद्दल आणि खाद्य परंपरेबद्दलची शहा यांची आत्मीयता दिसून आली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मलकापूर, नांदलापूर परिसरात तासाभराच्या पावसात सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी; वाहनचालकांना मोठा त्रास
पुढील बातमी
कोयनेच्या जलाशयाने गाठला तळ; पाण्याखाली गेलेली जुनी गावे, मंदिर, घरांचे अवशेष पुन्हा दिसू लागले

संबंधित बातम्या