गुरुवार पेठ परिसरात जागेच्या वादातून हॉटेल व्यावसायिकाला मारहाण; रोकड हिसकावल्याचा आरोप

by Team Satara Today | published on : 06 June 2026


सातारा : शहरातील गुरुवार पेठ परिसरात मोकळ्या जागेच्या वादातून हॉटेल व्यवसायिकावर हल्ला करून त्याच्याकडील रोकड जबरदस्तीने घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विजय सराफ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जागेच्या वादातून त्यांच्यावर लाकडी वस्तूने हल्ला करण्यात आला. या घटनेत त्यांच्या हात, पोट आणि बरगडीला दुखापत झाली. तसेच खिशातील काही हजार रुपयांची रोकड आरोपींनी बळजबरीने घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यावेळी फिर्यादीच्या भावालाही बाहेर अडवून ठेवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शिवीगाळ, दमदाटी तसेच मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कमलेश निकोडे, शोभा निकोडे आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे तपास करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गुरुवार पेठ परिसरात घर दुरुस्तीच्या वादातून मारहाण; जातिवाचक अपमान केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
पुढील बातमी
वैवाहिक वादातून पत्नीने भावाच्या मदतीने अभियंता पतीला कट रचून संपविले; कराड शहर पोलिसांनी अवघ्या बारा तासात केला गुन्हा उघड

संबंधित बातम्या