पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने उपक्रम

by Team Satara Today | published on : 06 June 2026


सातारा  : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धन व वृक्षसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राहुल गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन)  निलेश घुले, कार्यकारी अभियंता (बांधकाम उत्तर), मोहसीन मोदी, जिल्हा परिषद सदस्य श्री हनमंतराव जगदाळे तसेच जिल्हा परिषदेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्त्व यावेळी उपस्थितांनी विशद केले.

पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच यावेळी सर्व देशी वाणाच्या जातीचा वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये आवळा, शेवगा,सिताफळ व आंबा यांचा समावेश आहे


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा-सांगलीतील राजकारण एका मंत्र्यामुळे दूषित - अभयसिंह जगताप; आमची लढाई व्यक्तीविरोधात नसून एका प्रवृत्तीविरोधात
पुढील बातमी
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साताऱ्यात शिवरायांना मानाचा मुजरा; पोवई नाक्यावर खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह शिवप्रेमींची उपस्थिती

संबंधित बातम्या