अलिबागच्या युवकाने आजीचा खून करुन मृतदेह दरीत फेकला; आंबेनळी घाट पुन्हा चर्चेत, संशयित युवक ताब्यात

by Team Satara Today | published on : 04 June 2026


महाबळेश्वर : महाबळेश्वरचा आंबेनळी घाटात स्कोर्पिओ कोसळून ठार झालेल्या आठ युवकांच्या घटनेमुळे चर्चेत असलेला आंबेनळी घाट एका वृध्देचा खुनाच्या घटनेने पुन्हा चर्चेत आला. पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत आंबेनळी घाटात अलिबागच्या युवकाने त्याच्या आजीचा खून करुन पुरावा नष्ठ करण्यासाठी तिचा मृतदेह घाटातील खोल दरीत फेकून दिल्याचे समोर आले असून या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, खून प्रकरणी संशयित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अलिबाग येथील वृध्देचा खून करुन तिचा मृतदेह पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत आंबेनळी घाटातील बावळी टोक ते दाभेळी टोक दरम्यात दरीत फेकून दिला असल्याचे अलिबाग पोलीसांच्या तपासात समोर आले. युवकाने आजीचा खून करुन तिचा मृतदेह दरीत फेकून दिल्याची कबुली दिली.

यानंतर अलिबाग पोलिसांनी प्रतापगड रेस्क्यू टीम व महाबळेश्वर ट्रेकर्सच्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत खोल दरीत उतरुन रेस्क्यू ऑपरेशन राबवले. अथक परिश्रमानंतर वृध्देचा मृतदेह दरीतून वर काढण्यात यश आले. 

दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली असून अलिबाग पोलिसांनी खूनप्रकरणी संशयित युवकास अटक केली आहे. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पालखी सोहळा सुखकर पार पडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे - विभागीय आयुक्त शितल तेली-उगले; लोणंद ते फलटण दरम्यानच्या पालखी मार्गाची व तळांची पाहणी
पुढील बातमी
उडतारे येथे 'महा आरोग्य शिबिरास' उत्स्फूर्त प्रतिसाद; ५७२ हून अधिक रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार

संबंधित बातम्या