सातारा : अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी टँकर चालका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. दोन रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संतोष सुखदेव गर्जे (रा. पाटसरा, ता. आष्टी, जि. बीड) याने त्याच्या ताब्यातील टँकर (क्र. एमएच 12 यूएम 6215) पुणे-सातारा महामार्गावर लोकांच्या रहदारीस अडथळा होईल अशा प्रकारे व विना पार्किंग लाईट व रिफ्लेक्टर लावता उभा केल्याने प्रशांत दादा दडस (रा. ढगेवाडी, पोस्ट लिंब, ता. सातारा) हा चालवीत असलेल्या मोटर सायकलची टँकरच्या पाठीमागील बाजूस धडक झाल्याने अपघात झाला असून अपघातात दडस गंभीर जखमी झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार साठे करीत आहेत.