वाई शहरातील गणपती आळी येथे मधू फुटवेअर दुकानाला भीषण आग; ४० लाख रुपयांचे नुकसान

by Team Satara Today | published on : 04 June 2026


वाई : वाई शहरातील चित्रा टॉकीज परिसरातील गणपती आळी येथे बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास मधू फुटवेअर या चप्पल-बूट शोरूमला अचानक भीषण आग लागली. या आगीमध्ये दुकानातील माल जळून खाक झाला असून अंदाजे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

चित्रा टॉकीजजवळील मधू फुटवेअर या दुकानासह शेजारील लावपान टपरीलाही अचानक आग लागली. पहाटेच्या वेळी धूर व ज्वाळा दिसताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्‍यात आणण्‍याचा प्रयत्‍न केला. तसेच नगरपालिका अग्निशमन विभाग आणि वाई पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन बंब आणि पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत दुकानातील चप्पल, बूट व अन्य साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले होते. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुरवडीमध्ये भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले; दोन अज्ञात युवकांवर गुन्हा
पुढील बातमी
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा निश्चित; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

संबंधित बातम्या