सातारा : राधिका रोड परिसरात युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी सचिन किर्दत (रा. करंजे, सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 2 जून रोजी रात्री 9 वाजता राधिका सिग्नल ते राधिका रोड येथे घडली आहे. युवती अभ्यास करुन पायी घरी निघाली होती. त्यावेळी संशयिताने युवतीची छेड काढत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.