सातारा : दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या माध्यमातून शासनमान्य तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलुर (जि. नांदेड) येथे विविध व्यवसायाभिमुख प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी दिव्यांग युवक-युवतींकडून प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी ३० जून पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांसाठी १८ ते ४० वर्षे वयोगटातील अस्थिव्यंग, मुकबधिर, अंध आणि मतिमंद दिव्यांग मुला-मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे.
प्रशिक्षण केंद्रात विद्युत तारतंत्री, सर्व्हिसिंग ऑफ इलेक्ट्रिक डोमेस्टिक अप्लायन्सेस, मोबाईल रिपेअरिंग अँड सर्व्हिसिंग, फिटर, एलिमेंट ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर ऑपरेशन विथ एम.एस. ऑफिस, डेस्कटॉप पब्लिशिंग (DTP), कॉम्प्युटर अकौंटिंग अँड ऑफिस ऑटोमेशन तसेच अगरबत्ती, खडू व धूपनिर्मिती यांसारख्या रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
इच्छुक दिव्यांग युवक-युवतींनी किंवा त्यांच्या पालकांनी ३० जून २०२६ पर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, भायेगाव रोड, देगलुर, ता. देगलुर, जि. नांदेड. संपर्क क्रमांक : 9960900369, 9403207100, 7378641136.येथे संपर्क साधावा.