सांगली : भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार धैर्यशीलदादा कदम यांनी सातारा-सांगली विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज सांगली जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात भरला.
यावेळी खासदार उदयनराजे भोसले, नामदार चंद्रकांतदादा पाटील, नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नामदार जयकुमारभाऊ गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्य , दोन्ही जिल्ह्यातील नगरपालिका , नगरपंचायत मधील भा ज पा महायुतीचे नगरसेवक , भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते