जवळवाडी फाटा येथील ज्योतिबा मंदिर परिसरात धारदार शस्त्रासह फिरणारा जेरबंद

by Team Satara Today | published on : 01 June 2026


सातारा : जवळवाडी फाटा येथील ज्योतिबा मंदिर परिसरात संशयास्पदरित्या वावरणार्‍या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 मे रोजी रात्री गस्तीदरम्यान पोलिसांना एक व्यक्ती तोंड झाकून फिरताना आढळली. चौकशी व झडतीदरम्यान त्याच्याकडे धारदार तलवार असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गजानन मनोहर शिवणकर (वय 50, रा. वेणेगाव) याला ताब्यात घेतले.

पोलिसांच्या मते, संबंधित व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याने परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने कारवाई करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल केतन जाधव यांच्या फिर्यादीवरून बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंडित शिक्षण झालेल्या 697 महिलांनी पार केली दहावीची पायरी; उमेद अभियानाची गरुडझेप; सातारा जि. प. व प्रथम फौंडेशनचा उपक्रम
पुढील बातमी
जकातवाडी येथील तरुणी अद्याप बेपत्ता; दोन दिवसांपासून संपर्क तुटल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण

संबंधित बातम्या