सांगली तथा सातारा स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी ८ उमेदवारांचे १३ नामनिर्देशनपत्र दाखल

by Team Satara Today | published on : 01 June 2026


सांगली  :  महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 सांगली तथा सातारा स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ७ उमेदवारांचे १२ नामनिर्देशनपत्र दाखल झाले. या निवडणुकीसाठी एकूण ८ उमेदवारांचे १३ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.  

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्याकडे आज दाखल करण्यात आलेल्या  नामनिर्देशनपत्रांची माहिती अनुक्रमे - उमेदवाराचे नाव, पत्ता व पक्ष पुढीलप्रमाणे -

१) धैर्यशील ज्ञानदेव कदम, मु. पो. गोरेगाव (वांगी), ता. खटाव, जि. सातारा — भारतीय जनता पक्ष

२) पाटील प्रताप धोंडीराम, मु.पो. उरण इस्लामपूर, पाटील भजनी मंडपाजवळ — नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)

३) पाटील प्रताप धोंडीराम, मु.पो. उरण इस्लामपूर, पाटील भजनी मंडपाजवळ — अपक्ष

४) पाटील मयूर बाबासो, प्लॉट नं. 3, संजोग कॉलनी, पंचमुखी मारुती रोड, सांगली, ता. मिरज, जि. सांगली — इंडियन नॅशनल काँग्रेस

५) मेढे संजय नायकू, जुना हिराबाग रोड, वखार भाग, कोकणे गल्ली, नागोबा कट्टा जवळ, मिरज, ता. मिरज, जि. सांगली — इंडियन नॅशनल काँग्रेस

६) अभयसिंह खाशेराव जगताप, मु.पो. वरकुटे मलवडी, ता. माण, जि. सातारा — नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)

७) धैर्यशील ज्ञानदेव कदम, मु. पो. गोरेगाव (वांगी), ता. खटाव, जि. सातारा — भारतीय जनता पक्ष

८) धैर्यशील ज्ञानदेव कदम, मु.पो. गोरेगाव (वांगी), ता. खटाव, जि. सातारा — भारतीय जनता पक्ष

९) धैर्यशील ज्ञानदेव कदम, मु.पो. गोरेगाव (वांगी), ता. खटाव, जि. सातारा — भारतीय जनता पक्ष

१०) श्रीमती सीमा सुनील पोतदार, मु.पो. मार्डी, ता. माण (दहिवडी), जि. सातारा — अपक्ष

११) किशोर हनमंत धुमाळ, 123 बागडवाडा, शिवाजीनगर, गोडोली, सातारा — अपक्ष

१२) श्रीमती सीमा सुनील पोतदार, मु.पो. मार्डी, ता. माण (दहिवडी), जि. सातारा — अपक्ष


नामनिर्देशनपत्राची छाननी मंगळवार, दि. 2 जून रोजी होणार असून अर्ज माघारीचा दि. 4 जून 2026 असा आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर काळाच्या पडद्याआड
पुढील बातमी
शेंद्रेतील अतिक्रमणाविरोधात बहुजन युथ पॅंथर आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

संबंधित बातम्या