सातारा : पाऊस सुरू होण्यापूर्वी नदी पात्र व परिसरातील कचरा संकलन करून, नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी विशेष अभियान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व 5 जून जागतिक पर्यावरण दिन यांचे औचित्य साधून, कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात तब्बल 350 किलो कचर्याचे संकलन करण्यात आले.
कृष्णा व वेण्णा नदीचा संगम असलेले ठिकाण म्हणजे संगम माहुली दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. पर्यटक, भाविक मोठ्या संख्येने धार्मिक विधीसाठी येथे येत असतात. साहजिकच घाट व परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा होत असतो. पुलाच्या खालच्या बाजूला पाणी उपसा केंद्र असून, तेथून सातारा शहराच्या पूर्व भागात पाणी पुरवठा केला जातो. या मोहिमेमध्ये तब्बल साडेतीनशे किलो कचरा गोळा करण्यात आला .
आजच्या अभियानामध्ये, पर्यावरण संरक्षण गतिविधि जिल्हा संयोजक जयंत देशपांडे, अमोल कोडक, राजेश पुराणिक, रुपाली गुजर, हरित फ्रंट वॉरियर्सचे कन्हैयालाल राजपुरोहित,गोहाड, हरित सातारा ग्रुपचे विकास बहुलेकर, उमेश खंडूझोडे, सागर मित्र अभियानचे सोहम कुलकर्णी, आदिती जोशी, वेदांत अकॅडमीचे सागर व मुले-मुली, यशोदा शिक्षण संस्थेच्या साधना इंग्लिश स्कूलचे सुमित पाटील व एन सी सी चे कॅडेट, कर्म प्रतिष्ठानच्या अर्चनाताई देशमुख, संगम माहुलीचे उपसरपंच अविनाश कोळपे, रानवाटा मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, सातारा नगर परिषदेचे आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेवक रविंद्र पवार, संघाचे जिल्हा कार्यवाह महेश शिवदे, मुकुंदराव आफळे, जयदीप ठुसे, राष्ट्र संवर्धन संस्थेचे अशोक रेमझे, सागर कुलकर्णी, मेघा ताटे निसर्ग आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नदी पात्रातील प्रदुषण थांबवून, नदी पात्रात सोडण्यात येणारे ड्रेनेजचे पाणी फिल्टर करून सोडले जावे, अशी मागणी उपस्थित पर्यावरण प्रेमी नागरिक बंधू भगिनी यांनी केली. लवकरच जिल्हाधिकारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात येणार आहे.