साताऱ्यातील विसावा नाका येथील द लिटिल हार्ट कॅफेवर कारवाई; सहाजणांविरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 31 May 2026


सातारा : विसावा नाका येथील एका कॅफेमध्ये स्वतंत्र खोल्या तयार करून पैसे घेऊन एकांतासाठी सुविधा उपलब्ध करून देत अश्लील कृत्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी कारवाई करत सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी 2.30 च्या सुमारास विसावा नाका येथील लक्ष्मी प्लाझामधील द लिटिल हार्ट कॅफे येथे छापा टाकला. कॅफेमध्ये प्लायवूड व लाकडी सनमायका वापरून स्वतंत्र पार्टिशनयुक्त खोल्या तयार केल्या होत्या. या खोल्या प्रति तास 100 रुपये भाड्याने देऊन ग्राहकांना एकांतात बसण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचे तपासात आढळून आले.

छाप्यादरम्यान काही युवक-युवती अश्लील कृत्य करताना आढळून आल्याचा दावा पोलिसांनी केला. याप्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल क्रांती जाधव यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, त्यानुसार कॅफे चालक शिवराज विश्वास नावडकर (वय 25, रा. सोनगाव, ता. सातारा) याच्यासह सहाजणांविरोधात गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार मोरे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारारोड-किन्हई रस्त्यावर अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई; वाहनासह 2 लाख 79 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुढील बातमी
पाचगणी-महाबळेश्वर पर्यटकांनी बहरले; सुट्ट्यांच्या अखेरच्या टप्प्यात पर्यटकांची मोठी गर्दी

संबंधित बातम्या