वडूथ येथे जनगणना आणि मतदार मॅपिंग कामाचा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतला आढावा; अचूक व वेळेत काम करण्याचे दिले आदेश

by Team Satara Today | published on : 30 May 2026


सातारा :  सातारा तालुक्यातील वडूथ येथे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जनगणना आणि एसआयआर अंतर्गत मतदारांचे मॅपिंग तसेच या अनुषंगाने करायच्या पुढील कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. 

या बैठकीस उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. जनगणनेच्या कामाबाबत बोलताना जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी स्पष्ट केले की, घरोघरी जाऊन केली जाणारी घरांची गणना अत्यंत अचूक आणि निश्चित केलेल्या मुदतीतच पूर्ण झाली पाहिजे. सर्व पर्यवेक्षकांनी  प्रत्यक्ष जागेवर जाऊन या सर्व बाबींची काटेकोरपणे पडताळणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

एसआयआर प्रक्रियेचा आढावा घेताना जिल्हाध्यक्ष पाटील श्री. म्हणाले, ज्या मतदारांचे मॅपिंग अद्याप बाकी आहे, अशा राहिलेल्या सर्व व्यक्तींचे मॅपिंग लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. मतदार मॅपिंगचा वेग आणि टक्का वाढवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत.

 जनगणना आणि मतदार मॅपिंग ही अत्यंत महत्त्वाची व राष्ट्रीय स्तरावरील कामे आहेत. त्यामुळे सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणेने समन्वयाने काम करून हे उद्दिष्ट वेळेत साध्य करावे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी कृषी प्रक्रिया उद्योगांना बळ देणार : जिल्हाधिकारी संतोष पाटील; कृषी उद्योजक व एफपीओंच्या अडीअडचणींवर चर्चा
पुढील बातमी
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जून २०२६ दि. २८ जून रोजी

संबंधित बातम्या