पेरले फाटा येथून 33 वर्षीय महिला बेपत्ता; बोरगाव पोलीस ठाण्यात मिसिंगची फिर्याद

by Team Satara Today | published on : 29 May 2026


सातारा : पेरले फाटा, काशीळ येथून 33 वर्षीय महिला कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पेरले फाटा परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 33 वर्षीय महिला दि. 27 रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेल्या. त्या अद्यापपर्यंत घरी परतल्या नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली; मात्र काहीही माहिती मिळाली नाही.

याप्रकरणी संबंधित महिलेच्या मैत्रिणीने बोरगाव पोलीस ठाणे येथे मिसिंगची फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक कचरे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जकातवाडी गावच्या हद्दीत टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर; सातारा तालुका पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा
पुढील बातमी
कृष्णा खोरे विभागाच्या खोदकामामुळे यादववाडीतील शाळेला धोका ; तातडीने संरक्षण भिंत बांधण्याची मागणी ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

संबंधित बातम्या