जकातवाडी गावच्या हद्दीत टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर; सातारा तालुका पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 29 May 2026


सातारा : जकातवाडी गावच्या हद्दीत भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने 21 वर्षीय युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 25 रोजी सायंकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास जकातवाडी गावातील रामदास स्वामी यांच्या पावतका मंदिराजवळील वळणावर, सातारा-गजवडी सार्वजनिक रस्त्यावर हा अपघात झाला. टेम्पो चालकाने वाहन अविचाराने, निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवत समोरून येणार्‍या हिरो कंपनीच्या स्प्लेंडर दुचाकी (एमएच-11-डीएल-9221) ला जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्वार निशांत नितीन शिळमकर (वय 21, रा. जकातवाडी, ता. जि. सातारा) हा दुचाकीसह रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. त्याच्या चेहर्‍यास किरकोळ दुखापत झाली असून उजव्या पायाच्या मांडीचे हाड मोडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी निखिल नितीन शिळमकर (वय 22, रा. जकातवाडी) यांनी सातारा तालुका पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अनिकेत अविनाश माने (रा. डबेवाडी, ता. जि. सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार साठे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पोवईनाका परिसरात अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी युवकावर गुन्हा
पुढील बातमी
पेरले फाटा येथून 33 वर्षीय महिला बेपत्ता; बोरगाव पोलीस ठाण्यात मिसिंगची फिर्याद

संबंधित बातम्या