प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना बदनाम करू नका, अन्यथा तुमच्या काळातील भानगडी बाहेर काढाव्या लागतील - आ. महेश शिंदे यांचा इशारा

by Team Satara Today | published on : 29 May 2026


सातारा : खेड ग्रामपंचायतीमध्ये चांगले काम करणाऱ्या आमच्या पार्टीच्या सरपंचांना भ्रष्टाचाराच्या खोट्या प्रकरणात अडकवून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली आहे. याविरोधात योग्य यंत्रणेकडे दाद मागणार आहोत.

खेड ग्रामपंचायतीवर 40 वर्षांची असलेली सत्ता उलथवून टाकल्यानेच माजी आमदारांना पोटशूळ उठला आहे. इतकी वर्षे सत्ता देऊनही त्यांनी खेडची काय अवस्था करून ठेवली, हे माहीत आहे. त्यांनी कुठल्याही स्टेजवर यावे. आम्ही उत्तरे द्यायला तयार आहोत. मात्र, प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना बदनाम करू नका. अन्यथा तुमच्या काळातील भानगडी बाहेर काढाव्या लागतील, असा इशारा आ. महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

खेडच्या सरपंच अपात्रप्रकरणी विभागीय आयुक्तांनी जो निकाल दिला, त्याबाबत भूमिका मांडण्यासाठी आ. शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप शिंदे उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यातील काँग्रेस भवन बाहेर असलेल्या 4 ते 5 टपऱ्या जळून खाक; व्यावसायिकांचे मोठे नुकसान
पुढील बातमी
विजेचा धक्का बसून सेवा सोसायटीच्या सचिवांचा जागीच मृत्यू; पाणवन येथील दुर्दैवी घटना

संबंधित बातम्या