सातारा : परवाना नसताना व वेळेपेक्षा अधिक वेळ भुर्जी पावचा गाडा सुरु ठेवल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नितीन नंदकुमार मोरे (वय 40), मनोज प्रकाश मोरे (वय 40, दोघे रा. करंजेपेठ, सातारा) अशी दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दि. 27 मे रोजी एसटी स्टॅन्ड परिसरात ही कारवाई केली आहे.