विडणी येथे भरधाव कारने टेम्पोला दिलेल्या धडकेत युवकाचा मृत्यू; दोघेजण गंभीर जखमी; अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा

by Team Satara Today | published on : 28 May 2026


फलटण : विडणी (ता. फलटण) येथे भरधाव कारने टेम्पोला दिलेल्या धडकेत एका युवकाचा मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

मंगळवारी रात्री सुमारे 9.15 वाजण्याच्या सुमारास विडणी गावच्या हद्दीतील पवारवाडी शाळेजवळ पंढरपूर-पुणे मार्गावर हा अपघात घडला. पुण्याकडे जाणारा टेम्पो (क्र. एमएच 11 बीएल 6630) रस्त्याने जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या इर्टिगा कारने (क्र. एमएच 12 व्हीझेड 1158) टेम्पोला जोरदार धडक दिली.

या अपघातात तन्वीर अब्दुलरहीम बागवान (वय 25, रा. पाचबत्ती चौक, फलटण) यांचा जागीच मृत्यू झाला. तर भीमराव काशिनाथ अडागळे (रा. सोमवार पेठ, फलटण) आणि सलमा झारी (रा. शुक्रवार पेठ, फलटण) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी इम्तियाज युनूस बागवान यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, तपास पोलिस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तरुणांच्या स्वप्नांचा आंबेनळी घाटातील भीषण अपघाताने एका क्षणात चक्काचूर; पाच जिवलग मित्रांच्या मृत्यूने हळहळले आसगाव
पुढील बातमी
आपदग्रस्तांना तातडीच्या मदतीसाठी कोषागारातून रक्कम खर्च करण्यास मान्यता - मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा निर्णय

संबंधित बातम्या