सातारा : वृद्धाला मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि. 26 रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान रंगराव बाळू जातक (रा. वर्णे, ता. सातारा) यांना काठीने आणि विटेने मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी तेथीलच एका महिलेविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार निंबाळकर करीत आहेत.