कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. ज्योती जाधव यांची नियुक्ती करण्यात आल्याचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांनी जाहीर केले. डॉ. जाधव पहिल्या महिला प्र-कुलगुरू ठरल्या आहेत.
कुलगुरू डॉ. कामत यांनी सोमवारी दुपारी कुलगुरू कार्यालयात नियुक्तीचे पत्र त्यांना प्रदान केले. तसेच, पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, डॉ. जाधव यांचे शैक्षणिक व संशोधकीय योगदान उच्च दर्जाचे आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा विद्यापीठाला निश्चितपणे होईल. त्याचप्रमाणे कुलगुरूंनी सर्व विद्याशाखांच्या प्रभारी अधिष्ठाता यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये डॉ. राजाराम गुरव (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा), डॉ. महादेव देशमुख (मानव्यविज्ञान विद्याशाखा), डॉ. वर्षा मैंदर्गी (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा) व डॉ. अजय साळी (आंतरविद्याशाखा) यांची नियुक्ती करण्यात आली.