डोंगरावरील दगडांमुळे अनावळे गाव धोक्याच्या छायेत; प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची मागणी

दगड खाली आल्यास मोठी जीवीत व वित्तहानी ; टेकडीच्या पायथ्याशी गावठाण हद्दीतील घरे

by Team Satara Today | published on : 26 May 2026


सातारा : सातारा ते कास रस्त्यावर असलेल्या अनावळे गावाच्या वर असलेल्या टेकडीवर अनेक दगड धोकादायक स्थितीत आहेत. पावसाळ्यात हे दगड खाली आल्यास ते खाली असलेल्या घरांवर येवू शकतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची पावसाळ्यापूर्वी तातडीने पाहणी करुन दगड हटवावे, अशी मागणी आत्माराम माने व ग्रामस्थांनी केली आहे.

अनावळे येथे गावाच्या उत्तरेस असणार्‍या टेकडीवरील उतारावर असणारे मोठमोठे दगड पावसाळ्यात माती भुसभुशीत झाल्यावर किंवा भूस्खलन झाल्यास उतारावरून गावातील घरावर येऊ शकतात. या टेकडीच्या पायथ्याशी उतारावर ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी इमारत व इतर ग्रामस्थांची घरे किंवा सर्व गावठाण हद्दीतील घरे आहेत. उतारावरील दगडांच्या टप्यात ही घरे येतात. दगड खाली आल्यास मोठी जीवीत व वित्तहानी होऊ शकते प्रशासनाने पाहणी करून उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रत्येक गावाने सौर ऊर्जा निर्मितीकडे पुढाकार घ्यावा - आ. महेश शिंदे, चंचळी येथे ८ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण
पुढील बातमी
लघु कुंभमेळ्याने दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या वाई नगरीत भक्तीचा महासागर; कृष्णाघाट परिसर भक्तांनी फुलून गेला

संबंधित बातम्या