रक्षक प्रतिष्ठानचा पदाधिकारी मेळावा जलमंदिर पॅलेस येथे उत्साहात; खा. उदयनराजे यांची उपस्थिती; नव्या प्रेरणादायी गाण्याचे अनावरण

by Team Satara Today | published on : 25 May 2026


सातारा : सुशीलदादा मोझर यांच्या नेतृत्वाखाली रक्षक प्रतिष्ठानचा भव्य पदाधिकारी मेळावा सातार्‍यातील जलमंदिर पॅलेस येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमास खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. राज्यातील विविध भागांतून आलेल्या पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मेळाव्यात सहभाग घेतला.

यावेळी रक्षक प्रतिष्ठानच्या नव्या प्रेरणादायी गाण्याचे अनावरण करण्यात आले. हे गीत खा. उदयनराजे यांनी मोझर यांच्या समवेत गाडीत बसून ऐकले. त्यांनाही ते भावले. सामाजिक बांधिलकी, युवकांचे संघटन आणि समाजहिताचे कार्य या संदेशांवर आधारित हे गीत उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरले.

कार्यक्रमात बोलताना छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रक्षक प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. समाजासाठी नि:स्वार्थ भावनेने काम करणार्‍या युवकांची आज समाजाला गरज आहे. रक्षक प्रतिष्ठान सामाजिक क्षेत्रात चांगले कार्य करत असून युवकांनी एकजुटीने समाजकार्यात पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

मेळाव्यात संघटनेच्या आगामी उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मोझर यांनी संघटनेच्या आगामी उपक्रमांची माहिती देत कार्यकर्त्यांना अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात झाला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
समर्थ मंदिर परिसरात अतिक्रमणांवर पालिकेचा बुलडोझर; वाहतूक कोंडीवर निर्णायक कारवाई; आत्मदहनाच्या प्रयत्नाने तणाव
पुढील बातमी
आंबेनळी घाटात काळरात्रीचा कहर; मृतदेह बाहेर काढण्यासाठी जीवाची बाजी; पोलिस, ट्रेकर्स आणि ग्रामस्थांची शर्थीची मोहीम

संबंधित बातम्या