रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग चेअरमनपदी आमदार रोहित पवार; दक्षिण विभागाच्या चेअरमनपदी कोल्हापूरच्या संगीता प्रशांत पाटील

by Team Satara Today | published on : 23 May 2026


सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या चेअरमनपदी आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली. तसेच दक्षिण विभागाच्या चेअरमनपदी कोल्हापूरच्या संगीता प्रशांत पाटील यांची निवड पुण्यातून शुक्रवारी जाहीर करण्यात आली.

सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांच्या दर तीन वर्षांनी निवडी होतात. साताऱ्यात ९ मे संस्थेचा वर्धापन दिन झाला. त्यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सहसचिवपदी संबंधित पदाधिकाऱ्यांच्या फेरनिवडी करण्यात आल्या.

मात्र, इतर निवडीसाठी मॅनेजिंग कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांची सभा शुक्रवारी (दि. २२) पुण्यात झाली. त्यावेळी पूर्वीच्या निवडी कायम ठेवताना उत्तर व दक्षिण विभागाच्या चेअरमनपदी अनुक्रमे रोहित पवार व संगीता पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

संगीता पाटील या रयत शिक्षण संस्थेच्या सदस्य असून, कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन म्हणून कार्यरत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मान्सूनची जोरदार प्रगती ; भारतीय किनारपट्टीजवळ आला, दोन ते तीन दिवसांत केरळ, तामिळनाडूसह दक्षिण किनारपट्टीवर
पुढील बातमी
सांगली-सातारा मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दावा; महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न ऐरणीवर

संबंधित बातम्या