फायनान्स कंपनीच्या सीलबंद घरात घुसखोरी; मालमत्तेचे कुलूप तोडून वास्तव्य केल्याप्रकरणी वर्ये येथील दाम्पत्यावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 23 May 2026


सातारा : कर्ज थकबाकीमुळे फायनान्स कंपनीने जप्त करून बंद केलेल्या मालमत्तेचे कुलूप तोडून पुन्हा वास्तव्य केल्याप्रकरणी एका दाम्पत्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्ये येथील विजया बँक एटीएमसमोरील घर टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स कंपनीने अधिकृतरीत्या सील केले होते. मात्र काही दिवसांनंतर संबंधित मालमत्तेत पुन्हा वास्तव्यास असल्याचे कंपनीच्या निदर्शनास आले. तपासात कर्जदारांनीच कुलूप तोडून प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले.

कंपनीचे प्रतिनिधी प्रकाश नवांगे (रा. पुणे) यांच्या तक्रारीवरून बाळासाहेब जाधव आणि सविता जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गस्तीदरम्यान संशयित सातारा तालुका पोलिसांकडून युवक जेरबंद; घरफोडीची हत्यारे हस्तगत
पुढील बातमी
लोकप्रतिनिधींनी स्वेच्छेने निवृत्तीवेतनाचा त्याग करावा - सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांचे आवाहन, आवाहनास मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचा प्रतिसाद

संबंधित बातम्या