सातारा : रात्रीच्या गस्तीदरम्यान संशयास्पदरि त्या वावरणाऱ्या युवकाला सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून घरफोडीसाठी वापरली जाणारी साधने जप्त करण्यात आली आहेत.
शेंद्रे चौक ते कराड मार्ग परिसरात पोलिसांची गस्त सुरू असताना एचपी पेट्रोल पंपाजवळ एक युवक संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे स्क्रू ड्रायव्हर आणि लोखंडी छन्नी आढळून आली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
अरमान काजीम अलिखान (२४, रा. शेंद्रे) असे संबंधित युवकाचे नाव असून पोलीस हवालदार पंकज ढाणे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास हवालदार निकम करत आहेत.