नागठाणे येथे शुक्रवारी वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू; परतीच्या प्रवासाला जाण्याच्या बेतात असतानाच काळाचा घाला

by Team Satara Today | published on : 23 May 2026


बोरगाव : नागठाणे (ता. सातारा) येथे शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. तुकाराम सिधु होनमाने (वय 65, मूळ रा. गोरडवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर, सध्या रा. नागठाणे) असे मृत मेंढपाळाचे नाव आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील आपल्या मूळगावी परतीच्या प्रवासाला जाण्याच्या बेतात असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. पाऊस फारसा कोसळला नसला तरी विजांच्या थरथराटाने अवघा परिसर भेदरुन गेला.

नागठाणे, अतीत हद्दीवरील शिव नावाच्या शिवारात तुकाराम होनमाने हे आपल्या मेंढ्यांच्यासाठी भुईमूगचे वेल गोळा करत होते. सायंकाळी पाचच्या दरम्यान विजेच्या कडकडाटसह पाऊस सुरू झाला. यावेळी ते शेतातील झाडाजवळ थांबले होते. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात ते जागीच ठार झाले.

या घटनेची माहिती मिळताच नागठाणेचे मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच बोरगाव पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तुकाराम होनमाने यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नागठाणे येथे वीज पडून मेंढपाळाचा दुर्दैवी मृत्यू
पुढील बातमी
सातारा शहर परिसरात सलग बेपत्ता प्रकरणांनी चिंता वाढली; पोलिसांकडून विविध पथकांच्या माध्यमातून शोधकार्य सुरू

संबंधित बातम्या