नीट पेपरफुटीप्रकरणी काँग्रेस कार्यकारिणीचे साताऱ्यात निषेध आंदोलन; पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

by Team Satara Today | published on : 22 May 2026


सातारा  : नीट परीक्षा पेपरफुटीच्या घटनेमुळे देशभरातील 22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाला आहे. याला जबाबदार असणाऱ्या शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा सरकारने राजीनामा घ्यावा अशी मागणी करत सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवतीर्थ पोवई नाका येथे निषेध आंदोलन केले.

विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या आणि शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता संपवणाऱ्या या भ्रष्ट व्यवस्थेचा आता शेवट करण्याची गरज आहे. पेपर लीकमुळे नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिक व शैक्षणिक आयुष्यावर गंभीर परिणाम झाले आहेत. यातील काहींनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. नीट परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास टिकवण्यासाठी पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सुषमा राजेघोरपडे, प्रदेश सचिव धनश्री महाडिक, श्रीकांत कांबळे, मालन परळकर, सादिक बागवान, प्राची ताकतोडे, माधवी वर्पे, गणेश शिंदे, धनराज जगदाळे, संदीप जाधव उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाराष्ट्र हा केवळ भूप्रदेश नाही तर भारतीयांच्या स्वाभिमानाचा विषय - छत्रपती वृषालीराजे भोसले, इतिहास संशोधक, अभ्यासक, विविध संघटनाचा पुण्यात मोर्चा
पुढील बातमी
तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप; साताऱ्यात युथ पॅंथरची निदर्शने, न्यायव्यवस्था आणि शासनाच्या भूमिकेविरोधात संताप

संबंधित बातम्या