डॉ. सुरेश भोसले, आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांची कराड बाजार समितीत भेट; कृष्णा साखर कारखाना निवडणुकीसाठीउंडाळकर-भोसले गट एकत्र येण्याच्या चर्चेला बळ

भोसले गटाच्या नेत्यांनी बाजार समितीत दिलेली भेट त्याच चर्चेला पुष्टी देणारी ठरली

by Team Satara Today | published on : 22 May 2026


कराड : य. मो.कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी उंडाळकर-भोसले गट एकत्र येणार असल्याच्या चर्चेला गुरूवारी अधिक बळ मिळाले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले डॉ. सुरेश भोसले व आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराड शेती उत्पन्न बाजार समितीत भेट दिली. याठिकाणी त्यांचे स्वागत झाले. बाजार समितीतील त्यांची भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत उंडाळकर व भोसले गट एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर भेटीमध्ये झालेल्या अनौपचारिक चर्चेमुळे कारखान्याच्या निवडणुकीतील उंडाळकर गटाची भूमिका काय राहील याबाबत राजकीय आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. माजी सभापती विजयकुमार कदम यांनी डॉ. सुरेश भोसले, संचालक जंयतीलाल पटेल यांनी आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांचे स्वागत केले. यावेळी बाजारसमितीतर्फे चहापान देण्यात आला.

बाजार समितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची सत्ता आहे. कृष्णा कारखान्याच्या निमित्ताने उंडाळकर व भोसले गट एकत्र येणार अशी चर्चा आहे. त्यामुळे भोसले गटाच्या नेत्यांनी बाजार समितीत दिलेली भेट त्याच चर्चेला पुष्टी देणारी ठरली आहे. यावेळी भोसले गटाचे संचालक दयानंद पाटील, जगदीश जगताप उपस्थित होते. भोसले गटाने दिर्घ कालवधीनंतर बाजार समितीत भेट दिली असल्याने त्याची जोरात चर्चा होती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ठाण्यातील अग्निकांडात कोरेगावच्या बिचुकले गावातील अग्निशामक जवानाचा दुर्दैवी मृत्यू
पुढील बातमी
लाच प्रकरणी सिव्हीलच्या सहाय्यक अधीक्षकाला कोठडी; साताऱ्यातील धडक कारवाई सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली

संबंधित बातम्या