जी.डी.सी. अँड ए. व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन पदविका परिक्षा २६ ते २८ मे रोजी

by Team Satara Today | published on : 21 May 2026


सातारा :  शासकीय सहकार खात्यांतर्गत जी.डी.सी. अँड  ए. व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन पदविका परिक्षा  मे २०२६ ही परीक्षा दिनांक २६, २७ व २८ मे २०२६ रोजी सकाळी १० ते १ व दुपारी २ ते ५ या वेळेत छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा व धनंजय गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या दोन परीक्षा केंद्रावर घेणेत येणार आहे. 

ज्या परिक्षार्थीना प्रवेशपत्र मिळालेले नाही. त्या परिक्षार्थीनी परीक्षेपूर्वी १ दिवस अगोदर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा,नवीन प्रशासकीय इमारत, हजेरी माळ, सदरबझार, सातारा, एस.टी. स्टँडच्यामागे या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन केंद्र प्रमुख जी.डी.सी. अॅण्ड ए. परिक्षा केंद्र, १२ सातारा तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा संजयकुमार सुद्रिक यांनी केले आहे.  परीक्षा प्रवेशपत्र मिळणेसाठी परीक्षार्थीनी ओळखी दाखल पुरावा म्हणून आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा पॅन कार्ड इत्यादी व आयकार्ड साईज दोन फोटो घेऊन यावेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सांगली- सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
पुढील बातमी
समाजसुधारणेचा दीपस्तंभ : राजा राममोहन रॉय

संबंधित बातम्या