खंडाळा : शेतजमीन नावावर करण्याच्या कारणावरून हरळी (ता. खंडाळा) येथे कौटुंबिक वाद हिंसक वळणावर गेला. एका व्यक्तीने स्वतःच्या भावासह वृद्ध आई-वडिलांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतजमिनीच्या हस्तांतरणावरून सुरू असलेल्या वादातून संशयिताने लाकडी दांडक्याने भावावर हल्ला केला. तसेच आई-वडिलांनाही धक्काबुक्की व मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.