सातारा : मांडवे धरण परिसरातून मोटार पंपासाठी वापरण्यात येणारी महागडी कॉपर वायर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, सुमारे १२ हजार रुपये किमतीची तीन फेज कॉपर वायर चोरी करण्यात आली. चोरट्यांनी वायर जाळून त्यातील तांबे वेगळे केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.